मुख्य सामग्री पर जाएँ

सात म्हणजे सात! उपेंद्र लिमयेंनी सांगितली साऊथची शिस्त

सात वाजताच्या शिफ्टला जास्तीत जास्त सात वाजून पाच मिनिटांनी पहिला शॉट; आपल्याकडे आठ-साडेआठला शूटिंग सुरू होत असल्याकडे वेधले लक्ष

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

सात म्हणजे सात! उपेंद्र लिमयेंनी सांगितली साऊथची शिस्त
सात वाजताच्या शिफ्टला जास्तीत जास्त सात वाजून पाच मिनिटांनी पहिला शॉट; आपल्याकडे आठ-साडेआठला शूटिंग सुरू होत असल्याकडे वेधले लक्ष

मुंबई : “साऊथमध्ये सात वाजताच्या शिफ्टला सात किंवा जास्तीत जास्त सात वाजून पाच मिनिटांनी पहिला शॉट रोल होतो,” असे सांगत अभिनेते उपेंद्र लिमये यांनी दक्षिणेतील चित्रपटसृष्टीच्या वेळपालनाचे कौतुक केले आहे. आपल्याकडे मात्र कलाकार सात वाजता येतात, मग तयार होतात आणि आठ-साडेआठला शूटिंग सुरू होते, असेही त्यांनी नमूद केले. ‘अभिजात मराठी फिल्मी’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“तिथे सात म्हणजे सात… जास्तीत जास्त ७.०५ होतील, त्यापुढे नाहीच. थोडा वेळ शूट झाले की नऊ वाजता ब्रेक होतो,” असे लिमये यांनी सांगितले.

‘ॲनिमल’ने दिले नवे वळण

‘ॲनिमल’ चित्रपटातील अवघ्या दहा मिनिटांच्या भूमिकेमुळे उपेंद्र लिमये यांच्या चित्रपट कारकिर्दीला नवे वळण मिळाले. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी या चित्रपटातील ‘फ्रेडी पाटील’ या भूमिकेच्या तेलुगू आवृत्तीसाठीही स्वतःच डबिंग केले होते. त्यामुळे दक्षिणेतही त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली.

दक्षिणेत सिनेमाबद्दलची क्रेझ प्रचंड वेगळी आहे. चाहते एखाद्या कलाकारावर वेड्यासारखे प्रेम करतात, ही खरोखर खूप भारी गोष्ट आहे, असे लिमये नेहमी सांगतात. या मुलाखतीत त्यांनी तिथल्या कॉल टाइमच्या शिस्तीचेही कौतुक केले.

प्रवीण तरडेंनीही केले होते कौतुक

यापूर्वी अभिनेते प्रवीण तरडे यांनीही दक्षिणेतील या शिस्तीचे कौतुक केले होते. “साऊथमध्ये सकाळी सातची शिफ्ट असेल, तर लोक सात वाजता न येता बरोबर साडेसहाला भूमिकेनुसार संपूर्ण तयारी करून बसतात. एवढी शिस्त मी आजपर्यंत कुठेही पाहिली नव्हती,” असे तरडे म्हणाले होते.

https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper