सांगवी-बोपोडी ब्रिज भ्रष्टाचाराची पोस्ट व्हाट्सअप वर केल्याने खुनी हल्ला; दोन अटकेत, तीन अल्पवयीन ताब्यात
जखमी व्यक्तीने दिला आत्मदहनाचा इशारा; तीस कोटींचा उड्डाणपूल आणि 22 कोटी रुपयांचे सुशोभीकरण यामुळे वाद
1 मिनट पठन

जखमी व्यक्तीने दिला आत्मदहनाचा इशारा; तीस कोटींचा उड्डाणपूल आणि 22 कोटी रुपयांचे सुशोभीकरण यामुळे वाद
पिंपरी: तीस कोटींचा उड्डाणपूल आणि 22 कोटी रुपयांचे सुशोभीकरण यामुळे वादात सापडलेल्या सांगवी बोपोडी ब्रिज बाबत व्हाट्सअप ग्रुप वर पोस्ट करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला पाच जणांनी रस्त्यात गाठून खुनी हल्ला चढवला. हा हल्ला स्थानिक नगरसेवकाच्या सांगण्यावरून झाला असल्याचे सांगत जखमी व्यक्तीने आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

दिलीप मारुतराव तनपुरे (वय ५९, रा. आनंदनगर जुनी सांगवी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी अभिषेक नारायण शेगडे (वय २०) आणि अंकित कुमार उर्फ कल्लू राजेश मोरया (वय १९) या दोघांना अटक करण्यात आली असून, या दोघांच्या अन्य तीन अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माकन हॉस्पिटल चौकामध्ये तनपुरे हे दुचाकीवरून जात असताना शुक्रवारी सायंकाळी पावणेसाच्या सुमारास आरोपींनी त्यांना पाठलाग करून अडवत त्यांच्यावर कोणी हल्ला चढविला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आसपास सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन आरोपींना अटक करीत अन्य तिघां विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
तनपुरे यांनी नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जुनी सांगवी येथील भाजपचे नगरसेवक आणि सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या विरोधामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सांगली परिसरातील काँग्रॅच्युलेशन्स नावाच्या व्हाट्सअप ग्रुप वर परिसरातील समस्या आणि अन्य माहितींची देवाण-घेवाण केली जाते.
तनपुरे हे देखील त्या ग्रुपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी बोपोडी जुनी सांगवी या उड्डाणपुलाबाबत भ्रष्टाचाराचे आरोप करणारी पोस्ट तनपुरे यांनी या व्हाट्सअप ग्रुप वर टाकली होती. या पुलाबाबत सध्या बराच वादंग चालू आहे. 33 कोटींचा पूल आणि 22 कोटींचे सुशोभीकरण यावरून बरेच चर्चा झालेली असतानाच आता तनपुरे यांनीही पोस्ट टाकली म्हणूनच त्यांच्यावर कोणी हल्ला करण्यात आला असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान या भागातील भ्रष्टाचाराबाबत बोलल्यामुळेच माझ्यावर हा कोणी हल्ला करण्यात आला असून या आरोपींना राजकीय पाठबळ देणाऱ्या नेत्यांना पाठीशी घातले गेल्यास आत्मदहन करेन असा इशारा तनपुरे यांनी दिला आहे.
Murderous attack on Sangvi-Bopodi Bridge corruption post on WhatsApp; Two arrested, three minors in custody
