मुख्य सामग्री पर जाएँ

शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गोळीबाराची सरकारकडून गंभीर दखल; दोषींना पाठीशी घालणार नाही – सुनेत्रा पवार

पुणेकरांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाला कडक निर्देश

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

1 मिनट पठन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे, महाराष्ट्र मिरर – शहरातील अत्यंत गजबजलेल्या शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची राज्य सरकारने दखल घेतली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. तसेच पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

शिवाजीनगर न्यायालयाबाहेर घडलेली गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अशा घटनांकडे सरकार गांभीर्याने पाहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलिस प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. शहरातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे, गुन्हेगारी प्रवृत्तींवर लक्ष ठेवणे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाबाहेरच अशा प्रकारची घटना घडल्याने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

शेयर करें
स्मिता कुलकर्णी

रिपोर्टर-सबएडिटर

महाराष्ट्र मिरर