मुख्य सामग्री पर जाएँ

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर स्टंटबाजी करणाऱ्या पाच दुचाकीस्वारांना अटक

भरधाव आणि बेदरकार वाहन चालवून नागरिकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप; पाच मोटारसायकली पोलिसांकडून जप्त

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर स्टंटबाजी करणाऱ्या पाच दुचाकीस्वारांना अटक
भरधाव आणि बेदरकार वाहनचालवून नागरिकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप; पाच मोटारसायकली पोलिसांकडून जप्त

मुंबई: वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भरधाव वेगाने दुचाकी चालवणे, धोकादायक स्टंटबाजी करणे आणि सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालून नागरिकांना त्रास देणाऱ्या पाच दुचाकीस्वारांवर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अंधेरी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये दुचाकीस्वारांचा एक गट वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर धोकादायक पद्धतीने वाहन चालवताना आणि स्टंटबाजी करताना दिसत होता. त्यांच्या या बेदरकार कृत्यांमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अन्य वाहनचालकांच्या आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांच्या पथकाने व्हिडिओ आणि अन्य माहितीच्या आधारे संबंधित दुचाकीस्वारांची ओळख पटवून त्यांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे जावेद रफीक मालदार (२५), मोहसीन मुबारक शेख (१९), फैजान अहमद खान (२२), साहिल मोहम्मद सिराज (२९), आणि कुशल दत्ताराम भिसे (२२).

या कारवाईत पोलिसांनी एकूण पाच मोटारसायकली जप्त केल्या आहेत. संबंधित आरोपींनी केलेली स्टंटबाजी, बेदरकार वाहनचालवणे आणि निष्पाप वाहनचालकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कृत्यांबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper