मुख्य सामग्री पर जाएँ

वायसीएम रुग्णालयात एफडीएचा छापा; 1 कोटींहून अधिकचा औषध साठा जप्त

रुग्णांच्या जिवाशी खेळ! रुग्णालयातील कोट्यवधींची औषधे निकृष्ट

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

वायसीएम रुग्णालयात एफडीएचा छापा; 1 कोटींहून अधिकचा औषध साठा जप्त
रुग्णांच्या जिवाशी खेळ! रुग्णालयातील कोट्यवधींची औषधे निकृष्ट

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या वायसीएम रुग्णालयातील सेंट्रल मेडिकल स्टोअर वर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल १ कोटी ७२ लाख बाजारमूल्य असलेला ॲलोपॅथिक औषधांचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेला औषधांचा हा साठा निकृष्ट दर्जा तसेच विनापरवाना उत्पादित केलेला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर जप्त केलेल्या सर्व औषधांवर 'केवळ शासकीय पुरवठ्यासाठी' असा स्पष्ट उल्लेख असल्याचं देखील एफडीएकडून अधोरेखित करण्यात आलं आहे.

याबाबत एफडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार ४ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. तेव्हा,जप्त करण्यात आलेली ॲलोपॅथिक औषधे एकतर निकृष्ट दर्जाची आणि औषध उत्पादित करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी देखील उपलब्ध नसल्याची बाब एफडीएच्या निदर्शनास आली होती.

आरोग्य अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, या प्रकरणा बाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना विचारले असता औषधाच्या दर्जाबाबत आधीच शंका आल्याने आपण एफडीएला स्वतः हून कळवले होते आणि औषधांच्या गुणवत्ते बाबतचा तपासणी अहवाल प्राप्त होताच ही, औषध पुरवठा करणारी पुण्यातील मे. श्री विनायक फार्मा या कंपनीला ३ वर्षांसाठी निविदा प्रक्रियेतून प्रतिबंधित करण्यात आले. तर, जेजुरी येथील औषध उत्पादक कंपनी मे. इंडुकेअर फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च सेंटरला ब्लॅक लिस्ट करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.

कोणती निकृष्ट दर्जाची (औषधे आढळून आली?

अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत Cap. B-Complex with Zinc (CareZinc), Metronidazole Tablets IP 200mg (Caregyl-200), Rosuvastatin Tablets IP 5mg (LDLR-5) आणि Domperidone Tablets IP 10mg ही औषधे निकृष्ट दर्जाची (NSQ) आढळून आली असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper