मुख्य सामग्री पर जाएँ

वानवडीमध्ये पीएमपीएमएल बसच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावरील हिंदुस्तान चर्च सिग्नल चौकात अपघात; बसचालकाला अटक

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

वानवडीमध्ये पीएमपीएमएल बसच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावरील हिंदुस्तान चर्च सिग्नल चौकात अपघात; बसचालकाला अटक

पुणे, महाराष्ट्र मिरर : वानवडी परिसरातील पुणे-सोलापूर रस्त्यावर पीएमपीएमएल बसने सायकलस्वाराला जोरदार धडक दिल्याने ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास हिंदुस्तान चर्च सिग्नल चौकात घडला.

या प्रकरणी वानवडी वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार प्रमोद मोहारे यांनी फिर्याद दिली आहे. वानवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचालकाला वानवडी पोलिसांनी अटक केली असून, रामेश्वर पुंडलिक निकम (वय ५०, रा. गावडे वस्ती, भोसरी, पुणे) असे या बसचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निकम हा पीएमटी बस चालवत असताना त्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे बस चालवून त्याने सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलस्वार गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सागर भोसले पुढील तपास करीत आहेत.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper