मुख्य सामग्री पर जाएँ

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पत्नीच्या हत्येचा प्रयत्न

पत्नी गंभीर जखमी; पतीविरोधात गुन्हा दाखल

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पत्नीच्या हत्येचा प्रयत्न
पत्नी गंभीर जखमी; पतीविरोधात गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पतीने कार ट्रकला मागून धडकवून त्यानंतर धारदार शस्त्राने पत्नीच्या गालावर आणि दोन्ही हातांवर वार करून तिच्या हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, पतीविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) नुसार १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री आठच्या सुमारास पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग लिंक रोड आणि घाटातून येणारा रस्ता पुण्याकडील बाजूस ज्या ठिकाणी एकत्र येतो, त्या मावळ तालुक्यातील परिसरात घडली. मोनिका आशिष महामुनी (वय ३६, रा. कात्रज, पुणे) या पती आशिष दत्तात्रय महामुनी (वय ४९, रा. खारघर, नवी मुंबई) यांच्यासोबत मुंबईहून पुण्याकडे येत होत्या.

प्रवासादरम्यान पतीने कार मुद्दाम ट्रकला मागून धडकवली. त्यानंतर हातातील धारदार चाकू किंवा कटरसारख्या हत्याराने पत्नीच्या गालावर आणि दोन्ही हातांवर अनेक वार केले. या हल्ल्यात मोनिका महामुनी गंभीर जखमी झाल्या. पतीने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद त्यांनी पोलिसांकडे दिली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक म्हेत्रे तपास करीत आहेत.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper