मुख्य सामग्री पर जाएँ

भाजप आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती बिघडली

विषबाधेच्या संशयाने रुग्णालयात दाखल

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

भाजप आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती बिघडली
विषबाधेच्या संशयाने रुग्णालयात दाखल

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भाजपच्या हिंगलगंज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार रेखा पात्रा यांना विषबाधेच्या संशयावरून कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर व्हेंटिलेटर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी रात्री अचानक प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात आणि त्यानंतर बसिरहाट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना कोलकात्यात हलवण्यात आले.

राज्याचे आरोग्यमंत्री शरद्वत मुखर्जी यांनी सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, वैद्यकीय अहवालात कीटकनाशकासदृश विषारी पदार्थाच्या सेवनाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृतीवर पुढील काही दिवस लक्ष ठेवले जाणार आहे

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper