मुख्य सामग्री पर जाएँ

बसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

एसएनडीटी, कर्वेनगर येथील घटना; ८० हजार रुपये किमतीच्या बांगडीवर चोरट्याचा डल्ला**

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

बसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीला
एसएनडीटी, कर्वेनगर येथील घटना; ८० हजार रुपये किमतीच्या बांगडीवर चोरट्याचा डल्ला**

पुणे, महाराष्ट्र मिरर : पीएमपीएमएल बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने ७३ वर्षीय महिलेच्या हातातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास एसएनडीटी, कर्वेनगर येथे घडली.

याप्रकरणी एरंडवणे येथे राहणाऱ्या ७३ वर्षीय महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पीएमपीएमएलच्या बसमध्ये चढत असताना बसमधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी चोरली. अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper