मुख्य सामग्री पर जाएँ

पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून तरुणाला रॉडने मारहाण

काळेवाडी येथील घटना

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

 पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून तरुणाला रॉडने मारहाण
काळेवाडी येथील घटना

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : पोलिसांकडे आणि कोर्टात तक्रार केल्याच्या कारणावरून एकाने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवारी (२१ नोव्हेंबर) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाणेकर चौक, काळेवाडी येथे घडली.याबाबत प्रविण भारत मस्के (२४, पिंपळे गुरव) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुरेश दौलत कोकणे (२५, रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नाणेकर चौकातील पान टपरीवरून सिगारेट घेऊन जवळच उभे होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा आरोपी फॉर्च्युनर गाडीतून तिथे आला. त्याने लोखंडी रॉड घेऊन खाली उतरत, 'तू माझ्याविरोधात पोलीस आयुक्त कार्यालय, कोर्ट आणि चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज करतोस काय?' असे विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी रॉडने मारहाण करत फिर्यादीच्या कपाळाला दुखापत केली आणि पुन्हा अर्ज केल्यास बघून घेण्याची धमकी दिली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper