मुख्य सामग्री पर जाएँ

पूर्ववैमनस्यातून घरात घुसून मारहाण व धमकी

आरोपींविरुद्ध बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

पूर्ववैमनस्यातून घरात घुसून मारहाण व धमकी
आरोपींविरुद्ध बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्याने कोयते घेऊन घरात घुसून तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुसगाव येथे घडली.

याबाबत दीपक गोपीचंद पानपाटील (२१, सुसगाव) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज सर्जेराव पंडित (सुसगाव), राज दातीर (रावेत), माऊली काळभोर (रावेत), आदित्य सोनावणे आणि राहुल टकाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी कोयते आणले आणि दीपक यांच्या घरात शिरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरात कोयते घेऊन का आला आहेस, असे विचारल्यावर आरोपींनी शिवीगाळ करत' तू काय करणार आहेस. मी आमदाराचा भाऊ आहे. तू कुठल्यापण चौकीत जा.मी बघतो काय करायचे ते', अशी धमकी दिली आणि पुन्हा अंगावर धावून गेले. या प्रकरणी बावधन पोलीस तपास करत आहेत.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper