पुणे-सातारा रस्त्यावर बंगला फोडून ११.९५ लाखांचा ऐवज चोरीला
सेफ्टी दरवाजाचे कुलूप उचकटून चोरट्यांचा डल्ला
1 मिनट पठन

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे-सातारा रस्त्यावरील चंद्रविजय सोसायटीमधील शिवाई बंगला येथे घरफोडी करून चोरट्यांनी ११ लाख ९५ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. बंद बंगल्याच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. ही घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी एक या कालावधीत घडली.
याप्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या मालकाच्या सासूचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने सेफ्टी दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील एक लाख रुपये रोख, अमेरिकन डॉलर, सोन्या-चांदीचे दागिने आणि तांब्याच्या वस्तू असा एकूण ११ लाख ९५ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
आरोपीला अद्याप अटक झालेली नसून पोलीस उपनिरीक्षक शेळके पुढील तपास करीत आहेत.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
