मुख्य सामग्री पर जाएँ

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा! ५० हजारांचा लॅपटॉप प्रवाशाला सुखरूप परत

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा! ५० हजारांचा लॅपटॉप प्रवाशाला सुखरूप परत
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. बसमधून प्रवास करताना विसरलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची लॅपटॉप बॅग कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत संबंधित प्रवाशाला सुखरूप परत केली.

पुणे स्टेशन ते दिघी-आळंदी या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची लॅपटॉप आणि महत्त्वाचे शालेय साहित्य असलेली बॅग बसमध्येच राहिली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर बसचे वाहक श्रावण किसन पिंपळसे यांनी बॅग तातडीने आळंदी स्थानकावरील कंट्रोलर आवडाजी पवळे आणि गोविंद गुट्टे यांच्याकडे सुपूर्द केली.

त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यक खातरजमा करून बॅग तिच्या मूळ मालकाला परत केली. सुमारे ५० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि महत्त्वाचे शालेय साहित्य सुखरूप मिळाल्याने प्रवाशाला मोठा दिलासा मिळाला.

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेली प्रामाणिकता, तत्परता आणि प्रवाशांप्रती असलेली जबाबदारी कौतुकास्पद ठरत आहे. या कामगिरीबद्दल वाहक श्रावण किसन पिंपळसे, कंट्रोलर आवडाजी पवळे आणि गोविंद गुट्टे यांचे अभिनंदन होत आहे.

प्रवाशांचा विश्वास जपणाऱ्या या कृतीतून पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper