मुख्य सामग्री पर जाएँ

न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाचा वचपा घेण्याची भारताला संधी! आज दुसरा फुटबॉल सामना

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात ०-५ असा दारुण पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय पुरुष फुटबॉल संघ पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाचा वचपा घेण्याची भारताला संधी! आज दुसरा फुटबॉल सामना
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात ०-५ असा दारुण पराभव

ख्राइस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात ०-५ असा दारुण पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय पुरुष फुटबॉल संघ पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना रविवार, १५ नोव्हेंबर रोजी ख्राइस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ८.४० वाजता सामन्याला सुरुवात होईल.

पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर पूर्ण वर्चस्व गाजवले होते. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला भारतीय बचावपटू बिजॉय वर्गीसच्या स्वयंगोलमुळे न्यूझीलंडने आघाडी घेतली. त्यानंतर जेसी रँडलने ३४ आणि ४३व्या मिनिटाला गोल केले. कर्णधार ख्रिस वूडने ५७व्या, तर लॅचलन बेलिसने ७४व्या मिनिटाला गोल करत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या पराभवानंतर भारतीय संघाला बचावफळीतील त्रुटी दूर करण्याचे मोठे आव्हान आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने २३ शॉट्स मारले, तर भारताला केवळ चार शॉट्स मारता आले. भारतीय गोलरक्षक विशाल कैथने पेनल्टीसह सहा महत्त्वाचे बचाव करत संघाचा पराभव अधिक मोठा होण्यापासून रोखला होता.

मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांनी खेळाडूंना चुका सुधारून अधिक जबाबदारीने आणि जिद्दीने खेळण्याचे आवाहन केले आहे. पहिल्या सामन्यात चार भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. दुसऱ्या सामन्यात त्यांच्याकडूनही सुधारित कामगिरीची अपेक्षा आहे.दरम्यान, ख्राइस्टचर्चमधील २५ हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या पूर्णपणे छत असलेल्या वन न्यूझीलंड स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला पहिल्या पराभवातून सावरून दमदार पुनरागमन करण्याची संधी आहे.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper