मुख्य सामग्री पर जाएँ

तारेचे कुंपण घालण्यावरून झालेल्या वादात तरुणावर कोयत्याने हल्ला

हिंजवडी पोलिसांत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

तारेचे कुंपण घालण्यावरून झालेल्या वादात तरुणावर कोयत्याने हल्ला
हिंजवडी पोलिसांत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : तारेचे कुंपण घालण्याच्या कारणावरून दोघांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी एक वाजताच्या सुमारास मारुंजी येथे घडली.

सौरव सखाराम बुचडे (२८, मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संभाजी बुचडे आणि शेखर संभाजी बुचडे (दोघेही मारुंजी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला त्यांच्या जागेभोवती तारेचे कुंपण करायचे असल्याने त्यांनी शेजारील आरोपींना बोलावले होते. त्यावेळी तिथे आलेल्या संभाजी बुचडे याने फिर्यादीला मारहाण केली, तर त्याचा मुलगा शेखर याने धारदार लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या छातीवर आणि डोक्यात वार करून त्यांना जखमी केले. तसेच आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळही केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper