मुख्य सामग्री पर जाएँ

टीम इंडियासाठी काळा दिवस! न्यूझीलंडने 244 धावांनी लोळवले; रोहित-विराटसह दिग्गज फलंदाजांची दाणादाण

माऊंट माउंगानुई : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

माऊंट माउंगानुई : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.
न्यूझीलंडने भारताचा तब्बल 244 धावांनी धुव्वा उडवत मालिकेत जोरदार पुनरागमन केले.

माऊंट माउंगानुई : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने भारताचा तब्बल 244 धावांनी धुव्वा उडवत मालिकेत जोरदार पुनरागमन केले. 334 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या 89 धावांवर आटोपला. भारताने 26.4 षटकांत सर्व 10 विकेट गमावल्या. विशेष म्हणजे, वनडे क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा हा धावांच्या फरकाने झालेला दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.

पहिल्याच षटकात रोहित-विराटसह तीन फलंदाज बाद

भारताच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने पहिल्याच षटकात भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांना भोपळाही फोडू न देता माघारी धाडले. त्यामुळे भारताची अवस्था पहिल्याच षटकात 0 बाद 3 अशी झाली. या धक्क्यातून भारतीय संघाला शेवटपर्यंत सावरता आले नाही.

हेन्रीने भेदक गोलंदाजी करत 27 धावांत 6 विकेट्स घेतल्या. त्याला मॅथ्यू फिशरने तीन विकेट्स घेत चांगली साथ दिली. भारताकडून इशान किशनने सर्वाधिक 27 धावा केल्या, तर अक्षर पटेल आणि नमन धीर यांनी प्रत्येकी 21 धावांचे योगदान दिले. मात्र, इतर फलंदाज अपयशी ठरल्याने भारताचा डाव 89 धावांवर संपुष्टात आला.

विल यंगचे शतक; न्यूझीलंडची 333 धावांची मजल

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने विल यंगच्या शानदार शतकाच्या जोरावर 333 धावांची मजल मारली. यंगने 108 चेंडूंमध्ये 125 धावांची खेळी साकारली. त्याला टिम सेफर्टने 58 धावांची आक्रमक खेळी करत मोलाची साथ दिली. फिन अॅलननेही 41 धावा केल्या. भारतीय क्षेत्ररक्षकांनी यंगचे सुरुवातीलाच दोन झेल सोडल्याचा फटका संघाला बसला.

2000 मधील नकोसा विक्रमही मोडला

या पराभवासह भारताने न्यूझीलंडविरुद्ध धावांच्या फरकाने झालेल्या पराभवाचा नवा नकोसा विक्रम नोंदवला. यापूर्वी 10 ऑगस्ट 2010 रोजी दांबुला येथे न्यूझीलंडने भारताचा 200 धावांनी पराभव केला होता. मात्र, यंदाच्या चौथ्या वनडेत भारताला त्यापेक्षाही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

वनडे क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा पराभव 2000 मध्ये शारजाह येथे श्रीलंकेविरुद्ध 245 धावांनी झाला होता. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धचा 244 धावांचा पराभव भारताच्या वनडे इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. या विजयामुळे न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली आहे. मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

शेयर करें