जुन्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार; एकाला अटक
तिघांविरोधात दापोडी पोलिसांत गुन्हा दाखल
1 मिनट पठन

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (१४ नोव्हेंबर) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास विकासनगर, कासारवाडी येथे घडली.
या प्रकरणी अलीम मेहबुब नागोर (२२, विकासनगर, कासारवाडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमन रौफ बागवान (गुलिस्तान नगर, कासारवाडी) याला अटक केली असून, अय्याज बबलु शेख (२१, भाटनगर, पिंपरी) आणि इतर एकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलीम शनिवारी रात्री मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे तिन्ही आरोपी तेथे आले आणि त्यांनी जुन्या भांडणातून वाद घालत शिवीगाळ सुरू केली. या दरम्यान आरोपी अमन याने जवळ असलेला लोखंडी कोयता काढून फिर्यादीवर वार केले, ज्यामध्ये फिर्यादीच्या दोन्ही हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
