चार वर्षांनंतर पी. व्ही. सिंधू जागतिक क्रमवारीत अव्वल ५ मध्ये
भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानांकडे वाटचाल सुरू केली आहे
1 मिनट पठन

नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानांकडे वाटचाल सुरू केली आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (BWF) मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत सिंधूने एका स्थानाची सुधारणा करत पाचवे स्थान पटकावले आहे. तब्बल चार वर्षांनंतर तिने पहिल्यांदाच जागतिक अव्वल पाच खेळाडूंमध्ये पुनरागमन केले आहे.
अलीकडील स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरीचा सिंधूला या क्रमवारीत फायदा झाला आहे. फ्रेंच ओपनमध्ये उपविजेतेपद मिळवल्यानंतर तिने हायलो ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या यशामुळे तिच्या जागतिक क्रमवारीत सुधारणा झाली आहे.
यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये सिंधूने जागतिक अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर जवळपास चार वर्षांनी तिने पुन्हा या प्रतिष्ठित गटात प्रवेश केला आहे. दुखापती आणि कामगिरीतील चढ-उतारांनंतर केलेले हे पुनरागमन भारतीय बॅडमिंटनसाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. सिंधूच्या या यशामुळे तिच्या चाहत्यांसह क्रीडाविश्वातूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper
