मुख्य सामग्री पर जाएँ

गुरुवारी संपूर्ण पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा बंद!

जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीची कामे; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

गुरुवारी संपूर्ण  पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा बंद
जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीची कामे; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता

पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना गुरुवारी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा व्यवस्थेतील आवश्यक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये सेक्टर क्रमांक २३ येथील तसेच विविध क्षेत्रीय स्तरांवरील पाणीपुरवठ्याशी संबंधित स्थापत्य आणि विद्युत विषयक कामांचा समावेश आहे. या कामांसाठी गुरुवारी निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता असली, तरी सुरुवातीला तो अनियमित आणि कमी दाबाने होऊ शकतो.

पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन

गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी बुधवारीच आवश्यक पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. तसेच शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होईपर्यंत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper