मुख्य सामग्री पर जाएँ

कोल्हापुरात मध्यरात्री ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारने दोघांना उडवले, चुलत भावांचा मृत्यू

शिवाजी विद्यापीठाजवळ घडली घटना; पद्मसिंह रणजितसिंह पाटीलवर राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल, ताब्यात

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

कोल्हापुरात मध्यरात्री ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार
गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारने दोघांना उडवले, चुलत भावांचा मृत्यू

कोल्हापूर :- कोल्हापूर शहरातील शिवाजी विद्यापीठ परिसरात मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. गोकुळ दूध संघाचे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांचा मुलगा पद्मसिंह रणजितसिंह पाटील याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोघांना धडक दिल्याचा आरोप असून, या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. उमेश पाथरूड व गणेश पाथरूड यांचा जागीच मृत्यू; अपघातानंतर पळून गेलेल्या पद्मसिंह पाटीलला पोलिसांनी घेतले ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाजवळ मध्यरात्री ही थरारक घटना घडली. मद्यप्राशन करून भरधाव वेगात आलेल्या कारने दोघांना उडवल्याचे समोर आले आहे. या धडकेत उमेश पाथरूड आणि गणेश पाथरूड या दोन चुलत भावांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातानंतर पद्मसिंह पाटील घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून, राजारामपुरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

गोकुळच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर घटनेची जिल्ह्यात चर्चा; बीडच्या माजलगावमधील दुर्घटनेचाही उल्लेख

गत महिन्यात झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदाच्या निवडीवरून जिल्ह्यात चांगलेच राजकारण रंगले होते; त्यातच आता गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाशी संबंधित या अपघातामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी दुपारी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील गढी रोडवरही अशीच एक भीषण घटना घडली होती. तेथे नगरसेवक दिलीप मेंडके यांचा मुलगा दक्ष मेंडके हा चारचाकी चालवत असताना गाड्यांच्या रेसदरम्यान दुचाकीवरील गायकवाड दाम्पत्याला धडक देऊन 100 ते 150 फूट फरफटत नेल्याची घटना समोर आली होती, ज्यामध्ये दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतरही संताप व्यक्त केला जात आहे.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper