मुख्य सामग्री पर जाएँ

कुर्ल्यातील जोडप्याला मारहाण प्रकरण : आठ अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याची प्रक्रिया; घाटकोपर पोलिसांचा तपास सुरू

फिनिक्स मॉलजवळील उद्यानात फोटो काढताना छेडछाडीला विरोध केल्याने हल्ला; भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

कुर्ल्यातील जोडप्याला मारहाण प्रकरण
आठ अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याची प्रक्रिया

मुंबई :- कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलजवळील महापालिकेच्या उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या तरुण-तरुणीला आठ ते दहा अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याच्या घटनेत घाटकोपर पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. घटनेचा तपशील आणि व्हायरल चित्रफित ; छेडछाड व अश्लील शेरेबाजीला विरोध केल्यानंतर संतापलेल्या टोळक्याचा हल्ला; प्रत्यक्षदर्शींनी मोबाईलमध्ये कैद केला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (20 नोव्हेंबर) सायंकाळी कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मॉलजवळील उद्यानात तरुण आणि तरुणी छायाचित्रे टिपत असताना आठ ते दहा अल्पवयीन मुलांचा गट तेथे आला. त्यातील काही मुलांनी तरुणीची छेड काढत अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. या प्रकाराला तरुण-तरुणीने विरोध केल्यानंतर वाद चिघळला आणि अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहींनी या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला, जो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला.

पोलिसांची कारवाई आणि कलमांचा तपशील ; उपायुक्त गणेश शिंदे यांची माहिती; पीडितांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आठ अल्पवयीन ताब्यात समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मारहाण झालेल्या तरुण-तरुणीचा शोध घेतला. पीडितांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आठ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलीस उपायुक्त (DCP) गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आठ अल्पवयीन मुलांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 189(2), 189(4), 118(1), 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्व अल्पवयीन आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात असून, घटनेचा पुढील तपास घाटकोपर पोलिसांकडून सुरू आहे.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper