मुख्य सामग्री पर जाएँ

कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा

पहाटे २.२० वाजता विठ्ठल-रुक्मिणीची पूजा; बळीराजाच्या संकटातून मुक्तीसाठी पांडुरंगाला साकडे

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

1 मिनट पठन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी आणि वारकरी जोडपे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी आणि वारकरी जोडपे

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा भक्तिभावात पार पडली. पहाटे २ वाजून २० मिनिटांनी झालेल्या या महापूजेच्या वेळी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणी सुवर्णहार अर्पण करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याचे साकडे पांडुरंगाला घातले.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणींबाबत चिंता व्यक्त करताना शिंदे यांनी बळीराजाला मदत करण्यासाठी समाजातील लाखो हात पुढे आले पाहिजेत, असे आवाहन केले. माझ्याकडे मदतीसाठी येणारा कोणताही संकटग्रस्त माणूस रिकाम्या हाताने परत जाऊ नये, एवढीच मागणी मी नेहमी पांडुरंगाकडे करत असतो. सध्याच्या कठीण परिस्थितीतून बळीराजाला बाहेर काढ, असे साकडे विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी घातल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. सरकारकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

शेयर करें
स्मिता कुलकर्णी

रिपोर्टर-सबएडिटर

महाराष्ट्र मिरर