मुख्य सामग्री पर जाएँ

आळंदी जवळील गावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

पिंपळगाव गोलेगाव मध्ये हल्ल्यात ऊसतोड कामगार जखमी

विक्रांत कुलकर्णी
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

आळंदी जवळील गावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद
पिंपळगाव गोलेगाव मध्ये हल्ल्यात ऊसतोड कामगार जखमी

पिंपरी: आळंदी येथील पिंपळगाव गोलेगाव येथे लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला. पिंपळगाव मध्ये ऊसतोड कामगारांवर बिबट्याच्या हल्ल्यात कामगार जखमी झाला होता.

या जेरबंद झालेल्या बिबट्यास तपासणी व उपचारासाठी बिबट निवारा केंद्र, माणिकडोह येथे पाठविण्यात आले आहे.

या प्रसंगी वनपाल, आळंदी, आनंदकुमार इंदलकर, वनरक्षक दिपाली रावते, वनरक्षक नवनाथ पगडे, वनसेवक अजय कोळेकर, धनराज तोंडे, दौलत वाडेकर, किसन पारधी, राघू ठाकर यांचेसह इतर वनकर्मचारी उपस्थित होते.

पिंपळगाव तर्फे चाकण येथील सरपंच विलासराव नाथु काकडे यांचा जमीन गट नंबर २७ मध्ये शेतातील कर्मचारी ऊसतोड करीत असताना कर्मचारी अंबरसिंह महादु चव्हाण याच्यावर अचानक पणे बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते.

या वेळी इतर ऊसतोड कर्मचाऱ्यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने ऊसतोड कामगारास जखमी अवस्थेत सोडून पळ काढला होता. त्यानंतर जखमी चव्हाण यांना तत्काळ आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या वेळी सदर ऊसतोड सुरू असलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा झाले होते.

या पुढे देखील बिबट्याकडून ग्रामस्थ, ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुळे प्रभावी दक्षता उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली होती. या भागात तत्काळ वनविभाग अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्या प्रमाणे विभागाने तत्काळ कारवाई करून पिंजरा लावला होता. त्यात बिबट्या जेरबंद करण्यास यश आले.

शेयर करें
विक्रांत कुलकर्णी

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper