મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक

विनापरवाना कोयता जप्त करण्यात आला

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक

विनापरवाना कोयता जप्त करण्यात आला

पिंपरी : भोसरी येथील दिघी रोडवर पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणाला घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. क्रिश सुरेंद्र सिंग (१९, बोपखेल) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

बुधवारी (२७ मे) मध्यरात्री भोसरी येथील सॅण्डवीक कॉलनीसमोरील रस्त्यावर क्रिश सिंग हा पोलिसांना संशयास्पदरीतीने वावरताना आढळला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना कोयता मिळून आला. पोलिसांनी कोयता जप्त करत क्रिश याला अटक केली.

पोलीस कॉन्स्टेबल वैभव वाटकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भोसरी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

શેર કરો