મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

तळेगावात महिलेने आठव्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

‘अर्बन लाइफ टॉवर’ या उच्चभ्रू सोसायटीत एका ३५ वर्षीय महिलेचे कृत्य

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

तळेगावात महिलेने आठव्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

‘अर्बन लाइफ टॉवर’ या उच्चभ्रू सोसायटीत एका ३५ वर्षीय महिलेचे कृत्य

पुणे : तळेगाव एमआयडीसी परिसरातील ‘अर्बन लाइफ टॉवर’ या उच्चभ्रू सोसायटीत एका ३५ वर्षीय महिलेने आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हृदयद्रावक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिक हादरले आहेत.

प्रतिभा शंकर असे मृत महिलेचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, घटनेपूर्वी प्रतिभा आणि त्यांच्या पतीमध्ये कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद झाला होता. या वादानंतर भावनिक आवेशात त्यांनी थेट इमारतीच्या बाल्कनीतून खाली उडी घेतल्याचे सांगितले जात आहे. आठव्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेच्या वेळी सोसायटीतील काही नागरिकांनी आरडाओरड करत महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये महिला काही काळ बाल्कनीच्या रेलिंगला लटकलेली दिसत असून खाली उभे असलेले नागरिक तिला धीर देताना दिसतात. मात्र काही क्षणांतच तिचा हात सुटला आणि त्या खाली कोसळल्या. हा थरारक प्रसंग पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

શેર કરો