મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Water Supply : पुणेकरांनो अजून दोन तीन दिवस तरी गढूळ पाणीच भरा !

पुणे, महाराष्ट्र मिरर

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

2 મિનિટ વાંચન

Water supply

Water supply : गढूळ पाणीपुरवठ्याची नेमकी कारणे काय? महापालिका करणार तपास

पुणे, महाराष्ट्र मिरर

Water supply : शहराच्या विविध भागात गेल्या चार पाच दिवसापासून पिण्याचे पाणी गढूळ येत आहे. याबाबत हजारो तक्रारी नागरिकांनी व नगरसेवकांनी केल्या. त्यानंतर उपरती झालेल्या महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पत्रक काढून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्या असा मोलाचा सल्ला उशिरा का होईना दिला. दरम्यान प्रशासनाकडून जलशुद्धीकरण तसेच पाणी गढूळ येण्यामागच्या कारणांचा तपास तसेच चौकशी करण्यात येणार आहे. Water supply punekars muddy water next two days

पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शुक्रवारी याबाबतचा तपास करणार आहे. त्यानंतर शुद्ध पाण्यासाठी उपाययोजना होणार. त्यामुळे अजून किमान दोन तीन दिवस व कदाचित जास्तच दिवस पुणेकरांच्या नशिबी गढूळ पाणीच येणार ? अशी चिन्हे दिसत आहेत.  Water supply

गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वच सदस्यांनी शहरात होणाऱ्या गढूळ पाण्याच्या पुरवठ्यावर प्रशासनाला जाब विचारला. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भागांत होत असलेल्या गढूळ पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उद्या व परवा (१७ व १८ जुलै) पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला संयुक्त भेट देऊन पाहाणी करण्याचे, निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिले. Water supply

PMC : छत्रपती शिवाजीनगर परिसरातील सुमारे तीन हजार घरांना गढूळ पाण्याचा पुरवठा

पावसाळ्यात खडकवासला धरणातील वाढलेल्या गढूळतेचा जलशुद्धीकरण प्रक्रियेवर नेमका काय परिणाम होत आहे, याचा प्रत्यक्ष आढावा या भेटीत घेण्यात येणार आहे. भिमाले यांनी पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची विद्यमान क्षमता, यंत्रसामग्रीची स्थिती, वाढत्या पाण्याच्या मागणीमुळे पडणारा अतिरिक्त ताण तसेच पावसाळ्यात वाढणाऱ्या एन टी यू पातळीवर नियंत्रणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाबाबत प्रशासनाने सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. Water supply

तसेच  पुढील पंचवीस वर्षांची गरज लक्षात घेऊन  शहरातील सर्व जलशुद्धीकरण केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश भिमाले यांनी दिले.

पावसाळ्यापूर्वी सर्व पावसाळी कामे पूर्ण झाली असल्याचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. रस्त्यांची दुर्दशा, नाले सफाईचा दिखावा, रस्त्यावर पावसाळी गटारे नसल्याने तुंबणारे पाणी, आपत्ती व्यवस्थापन विभागचा दिखावा व आता पाणी पुरवठा विभागागाकडून पावसाळ्यापूर्वी न केलेली कामे व त्यामुळे पुणेकरांना मिळणारे दूषित पाणी अशा ना नाविध समस्यांचा पाढाच वाचवा तेवढा कमी आहे.

दरम्यान बैठकीत यावेळी प्रशासनाने गढूळ पाणीपुरवठ्याची नेमकी कारणे प्रत्यक्ष पाहणीनंतर निश्चित करण्यात येतील आणि त्यावर तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या जातील, अशी ग्वाही दिल्याचे भिमाले यांनी सांगितले .

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

શેર કરો