गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद
विद्युत पंपींग व स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे करणार
1 મિનિટ વાંચન

विद्युत पंपींग व स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे करणार
निलेश राऊत
पुणे: खडकवासला जॅकवेल (पर्वती रॉ वॉटर), खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. १ व २, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र व नव्याने समाविष्ट गावे बुस्टर पंपिंग अंतर्गत येणारा परिसर येथील विद्युत पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील संपूर्ण पुणे शहराचा गुरुवारी ( दि. २३) पुर्ण दिवस (बुधवार रात्री १२ पासून गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत) पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी याबाबत माहिती दिली.
येत्या गुरूवार दिनांक २३/०४/२०२६ रोजी नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर व पर्वती LLR टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसर, एस.एन.डी.टी. एच.एल.आर, एस.एन.डी.टी. एम.एल.आर टाकी परिसर, चतुश्रुगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र,
तसेच शुक्रवार दिनांक २४/०४/२०२६ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन जगताप यांनी केले आहे.
नव्याने समाविष्ट गावे बुस्टर पंपिंग अंतर्गत येणारा परिसर :-
*खडकवासला बुस्टर पंपिंगः मुकाई नगर, कोल्हेवाडी, खडकवासला गावठाण, शिवनगर,
*नांदेड बुस्टर पंपिंग: नांदोशी सणस नगर, कीरकट वाडी/DSK विश्व, नांदेडफाटा, JP नगर / गोसावी वस्ती, स.नं. २५, स,नं-२७, समाधी टाकी परिसर नांदेड गाव, सणस
*सणस शाळा बुस्टर पपिंग: गोकुळनगर, नन्हे, दरोडेजोग टाकी परिसर.
*हायवेब्रिज नन्हे बुस्टर पंपिंगः पाण्याची टाकी (गावठाण), तक्षशीला टाकी, दरोडे जोग टाकी, झील कॉलेज सोसायटी,
*बारांगणी मळा विहीर बुस्टर पंपिंग घायरी, डीएसके.
Water supply to entire Pune city to be cut off on Thursday
