મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

जलसंपदाचा कारभार आता कोल्हापूर येथून चालणार

निलेश राऊत पुणे: महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यरित असलेल्या शहरातील जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांचे नवे मुख्यालय आता कोल्हापूर येथे असणार आहे.

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

निलेश राऊत
पुणे: महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यरित असलेल्या शहरातील जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांचे नवे मुख्यालय आता कोल्हापूर येथे असणार आहे. विशेष प्रकल्पांच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे मुख्यालय आता सोलापूर असणार आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय सिंचन भवन इमारतीमधून स्वारगेट येथे स्थलांतरीत केले आहे.

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार हे बदल करण्यात आले आहेत.

त्यानुसार पुणे पाटबंधारे अधीक्षक अभियंता या कार्यालयाचे स्थलांतर पुण्यातच मध्यवर्ती इमारतीमध्ये केले आहे. ज्या प्रकल्पांचे बांधकाम ज्या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली आहे, त्याच मंडळाकडे त्या प्रकल्पांचे अन्वेषण, संकल्पन, भूसंपादन, पुनर्वसन, बांधकाम, सिंचन व्यवस्थापन व देखभाल दुरुस्ती देण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार महामंडळाचे अधीक्षक अभियंता सं. मा. सांगळे यांनी हे आदेश प्रसिद्ध केले आहेत. दि. १ जूनपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांना नव्या मुख्यालयातून कामकाज करावे लागणार आहे.

શેર કરો