Kohlapur News वारणा धरण भरले पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी
Kolhapur News : कोल्हापूर - चांगल्या पावसामुळे वारणा धरणात सध्या ९९.४४ टक्के पाणीसाठा झाला आहे.
1 મિનિટ વાંચન

Kolhapur News : कोल्हापूर - चांगल्या पावसामुळे वारणा धरणात सध्या ९९.४४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी सुरूच आहे. त्यामुळे वारणा धरण १०० टक्के भरण्याच्या मागार्वर आहे. धरणाचे दरवाजे बंद असून फक्त वीजनिमिर्ती केंद्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकेड पाणलोट क्षेत्रात सततच्या पावसामुळे धरणसाठ्यात वाढ होत असून वारणा धरण लवकरच १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. धरणातून १ जूनपासून १०.१६ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत
धरणात एकून ३४.२१ टीएमसी म्हणजे ९९.४४ टक्के पाणीसाठा झाला आहे. आता धरण भरण्यासाठी केवळ ०.२१ टीएमसी पाणीसाठा आवश्यक आहे. धरण क्षेत्रात पाऊसाची हजेरी सुरूच आहे, त्यामुळे वारणा धरण १०० टक्के भरण्याच्या मागार्वर आहे.https://maharashtramirror.com/ kolhapur News
