મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Beed News : वाल्मीक कराडला संभाजीनगरच्या कारागृहात हलवा; खासदार सोनवणेंची मागणी

Beed News :बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला बीड कारागृहातून छत्रपती संभाजीनगर कारागृहात हलविण्याची मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

वाल्मीक कराडला संभाजीनगरच्या कारागृहात हलवा; खासदार सोनवणेंची मागणी
वाल्मीक कराडला संभाजीनगरच्या कारागृहात हलवा; खासदार सोनवणेंची मागणी

Beed News : नऊ महिन्यांनंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही; कारागृह प्रशासनाला पत्राद्वारे जाब

Beed News :बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला बीड कारागृहातून छत्रपती संभाजीनगर कारागृहात हलविण्याची मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कारागृह अपर पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जानेवारी २०२५ मध्येच कराडला संभाजीनगर कारागृहात वर्ग करण्याचे आदेश दिले होते. मात्र, नऊ महिने उलटूनही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याचे सोनवणे यांनी पत्रात नमूद केले आहे.https://maharashtramirror.com/ Beed News

दरम्यान, केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणावरूनही बीडमधील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचे नाव जोडण्याचा वाल्मीक कराड प्रयत्न करीत असल्याचा आरोप ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून समोर आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सोनवणे कुटुंबीयांनी केली होती. या पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे यांनी कराडच्या कारागृहातील स्थलांतराचा मुद्दा उपस्थित केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे..https://maharashtramirror.com/ Beed News

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या कारागृह स्थलांतराबाबत आदेश होऊनही त्याची अंमलबजावणी का झाली नाही, असा प्रश्न सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. संबंधित आदेशाची अंमलबजावणी करून कराडला छत्रपती संभाजीनगर कारागृहात हलविण्याबाबत त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे. आता या पत्रावर कारागृह प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

શેર કરો