મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Crime : घरफोडीत सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास

Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : एका निवृत्त कर्मचाऱ्याचे घर फोडून चोरट्याने कपाटातील लॉकरमधून तब्बल ५ लाख १९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

घरफोडीत सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
घरफोडीत सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime : वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : एका निवृत्त कर्मचाऱ्याचे घर फोडून चोरट्याने कपाटातील लॉकरमधून तब्बल ५ लाख १९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.अशोक सावंत (रा. झेड मेन कॉलनी, वालचंदनगर, ता. इंदापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक सावंत हे २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्यासुमारास घर बंद करून बाहेर गेले होते. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ते परत आले असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. घरातील कपाटाचे लॉकर उघडलेले आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. चोरट्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले ३ लाख ६९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोक रक्कम असा एकूण ५ लाख १९ हजार रुपयांचा चोरून नेल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस हवालदार निर्मळ पुढील तपास करत आहेत.

શેર કરો