મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pimpri News : वाकड येथे तरुणाचा खून; तिघांना अटक

Pimpri news : पिंपरी: बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

वाकड येथे तरुणाचा खून; तिघांना अटक
वाकड येथे तरुणाचा खून; तिघांना अटक

Pimpri news : बहिणीची छेड काढल्याचा राग धरला मनात

Pimpri news : पिंपरी: बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (१९ सप्टेंबर) रात्री ११.३० वाजण्यापूर्वी वाकड येथील कावेरी नगर भाजी मंडई समोरील मोकळ्या जागेतील कचरा टाकण्याच्या ठिकाणी घडली.

मारोती बाळासाहेब बनसोडे (३५, रा. चिंचवड, मूळ- परळी, बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुग्रीव लक्ष्मण गायकवाड (५४, रा. मोशी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित दशरथ साळुंखे (२६, रा. थेरगाव, मूळ- बारामती), किशोर सुभाष वाघमारे (३९, रा. थेरगाव, मूळ- बीड) आणि भारत संजय पवार (२३, रा. थेरगाव, मूळ- बारामती, पुणे) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारोती बनसोडे याने आरोपी अमित याच्या बहिणीची छेड काढली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्या कारणावरून मारोती बनसोडे यांना आरोपींनी तोंडावर, गळ्यावर, हनुवटीवर आणि गुप्तभागावर जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો