Pune Crime : दुकानांचे पत्रे उचकटून घरफोड्या; आरोपी गजाआड
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : दुकानांचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत घरफोड्या करणाऱ्या संशयित आरोपीला वाघोली पोलिसांनी अटक केली.
1 મિનિટ વાંચન

Pune Crime : वाघोलीतील तीनसह चार गुन्ह्यांचा उलगडा; कपडे, मोबाईल, रोकड व वायर असा ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : दुकानांचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत घरफोड्या करणाऱ्या संशयित आरोपीला वाघोली पोलिसांनी अटक केली. तेजस विष्णू मेंढके (वय ३२, रा. गायरान, गोरे वस्ती, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून वाघोलीतील तीन घरफोड्यांमध्ये चोरीला गेलेल्या मालापैकी कपडे, मोबाईल फोन, रोकड आणि पॉलीकॅब वायर असा एकूण ९६ हजार ६७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत वाघोलीतील तीन आणि लोहगावमधील एक अशा चार गुन्ह्यांतील त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune News
वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोड्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान ६ सप्टेंबर रोजी रात्री वाघोली पोलिसांचे तपास पथक हद्दीत गस्त घालत होते.https://maharashtramirror.com/ Pune News
त्यावेळी पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे आणि योगेश शिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून दुकानांचे पत्रे उचकटून घरफोड्या करणारा संशयित गायरान, गोरे वस्ती परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने गोरे वस्ती येथील राहत्या घरातून संशयिताला ताब्यात घेतले.
सीसीटीव्हीमुळे पटली ओळख
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटवली. त्याने दिलेली कबुली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे प्रेस नोटमध्ये म्हटले आहे.
पोलिसांच्या तपासात वाघोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ६९२/२०२६, ६५८/२०२६ आणि ३४८/२०२६ तसेच लोहगाव पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २७३/२०२६ अशा चार गुन्ह्यांतील आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
९६ हजारांचा मुद्देमाल जप्त
वाघोली पोलीस ठाण्यातील तीन घरफोड्यांमध्ये चोरीला गेलेल्या मालापैकी कपडे, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि पॉलीकॅब वायर असा एकूण ९६ हजार ६७२ रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार आणि सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्यासह वाघोली पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
