Pune News : वडगावशेरीत बंद फ्लॅट फोडून चोरी; रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १ लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : वडगावशेरीतील सैनिकवाडी परिसरात बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
1 મિનિટ વાંચન

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : वडगावशेरीतील सैनिकवाडी परिसरात बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान घडली.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी वडगावशेरीतील ३५ वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
वडगावशेरीतील साने गुरुजी सोसायटी, शैलेंद्र अपार्टमेंट, सैनिकवाडी येथील फ्लॅट क्रमांक २ मध्ये ही चोरी झाली. फिर्यादी यांनी घराला कुलूप लावून फ्लॅट बंद केला होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातून रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३८ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.
