Pune News : वडगाव शेरीत बंद फ्लॅटमध्ये चोरी
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : वडगाव शेरीतील गणेशनगर परिसरात बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ८९ हजार ४२७ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
3 મિનિટ વાંચન

Pune News : कुलूप उचकटून चोरट्यांचा घरात प्रवेश; ४ लाख ८९ हजारांचा ऐवज लंपास
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : वडगाव शेरीतील गणेशनगर परिसरात बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ८९ हजार ४२७ रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान घडली.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी ४९ वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..https://maharashtramirror.com/ Pune News
गणेशनगर, वडगाव शेरी येथे फिर्यादी यांचा फ्लॅट बंद होता. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८.१५ ते १ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घराचे कुलूप कशाच्या तरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातून १५ हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ८९ हजार ४२७ रुपयांचा ऐवज चोरून नेला. अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.
गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाखाली फसवणूक
मोबाईल हॅक करून बँक खात्यातून ६ लाख २२ हजार रुपये लंपास
पुणे, महाराष्ट्र मिरर : गॅस कनेक्शन तत्काळ अपडेट करण्याच्या नावाखाली एका ४५ वर्षीय व्यक्तीची ६ लाख २२ हजार ११ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. एमएनजीएल कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून अज्ञात मोबाईलधारकाने फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि त्यांचा मोबाईल हॅक करून बँक खात्यातून रक्कम काढून घेतली.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १८ ऑगस्ट २०२६ रोजी ऑनलाइन माध्यमातून घडली. आंबेगाव येथील फिर्यादी यांना अज्ञात मोबाईलधारकाने फोन केला. आपण एमएनजीएल कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून गॅस कनेक्शन तात्काळ अपडेट करून घ्यावे, अन्यथा कनेक्शन बंद करण्यात येईल, अशी भीती दाखवली.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना ‘MNGL BILL UPDATE’ नावाची एपीके फाइल पाठवली. त्यामध्ये माहिती भरण्यास सांगून फिर्यादीचा मोबाईल हॅक केला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ६ लाख २२ हजार ११ रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक केली.
अज्ञात मोबाईलधारकाचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.
मांजरीतून साडेआठ लाखांचा ट्रक चोरीला
पहाटे पार्क केलेला ट्रक-टँकर गायब; मांजरी पोलिसांत गुन्हा दाखल
पुणे, महाराष्ट्र मिरर : मांजरी बुद्रुक परिसरातील विजयविहार कॉलनी येथे पार्क केलेला ८ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रक-टँकर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ३.२० वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली.
शिवरकर मळा येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय व्यक्तीचा हा ट्रक-टँकर असून, त्यांनी या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी त्यांचा ट्रक-टँकर वरद हॉस्पिटलसमोरील लेन क्र. एकमध्ये पार्क केला होता. अज्ञात व्यक्तीने तेथून हा ट्रक-टँकर चोरून नेला. चोरी झालेल्या वाहनाचा नोंदणी क्र. एमएच ०३ सीपी ४२७१ असा आहे. अज्ञात चोरट्याचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे करीत आहेत.
विश्रांतवाडीत ऑनलाइन फसवणूक
अज्ञात व्यक्तीने बँक खात्यातून ३ लाख ६५ हजार रुपये काढले
पुणे, महाराष्ट्र मिरर : विश्रांतवाडी परिसरातील ४० वर्षीय व्यक्तीची ऑनलाइन माध्यमातून ३ लाख ६५ हजार ६० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून ही रक्कम काढून घेतली.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २५ ऑक्टोबर २०२६ रोजी ऑनलाइन माध्यमातून घडली. फिर्यादी हे विश्रांतवाडी येथील राहत्या घरी असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातून ३ लाख ६५ हजार ६० रुपये काढून घेतले.
अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत करीत आहेत.
