Virar Jugar News : विरारमध्ये हाय-प्रोफाइल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा!
Virar Crime Branch Unit 3 Latest News : गुन्हे शाखा कक्ष-3 ने 14 जणांना अटक करून 61750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
1 મિનિટ વાંચન

Virar Crime Branch Unit 3 Latest News : गुन्हे शाखा कक्ष-3 ने 14 जणांना अटक करून 61750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
विरार :- गुन्हे शाखा, कक्ष-3Virar Crime Branch Unit 3 (विरार) च्या पथकाने एका मोठ्या कारवाईत विरार पूर्वेकडील एका म्हाडा संकुलातील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 14 जुगार खेळणाऱ्या इसमांना अटक केली असून, त्यांच्याकडून 61,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Virar Latest Crime News
ही कारवाई मंगळवारी (28 ऑगस्ट 2028) सायंकाळी करण्यात आली. गुन्हे शाखा कक्ष-3 चे सहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, विरार पूर्वेकडील म्हाडा संकुल, बिल्डिंग नं.14, रुम नं.1502 मध्ये काही लोक बेकायदेशीरपणे जुगार खेळत आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी या माहितीची खात्री करून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.
मिळालेल्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी आपल्या पथकासोबत दोन पंचांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी, मिलिंद कासला, निपुन बाबर, राजन शहा, तुषार खत्री, मल्हारी बेल्लूर, मयुरेश सर्वोदे, निरज चव्हाण, मितेश पाटील, सचिन गोटीयन, रोहित पाटील, चंद्रकांत देशपांडे, दिवाक्ष बाबर, राकेश वाघेला आणि सुशांत पवार हे 14 इसम एकत्र येऊन 'तीन पत्ती' जुगार खेळत असल्याचे आढळून आले.
या सर्व आरोपींविरुद्ध बोळींज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887, कलम 4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना बोळींज पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
या प्रभावी कारवाईसाठी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, सागर बारवकर, राकेश पवार, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, पोलीस अंमलदार तुषार दळवी आणि मनोहर तारडे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
