Nashik News : आदिवासींच्या प्रश्नांवर सरकार अपयशी : वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Nashik News नाशिक : आदिवासींच्या न्याय्य हक्कांचे आणि विविध प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.
2 મિનિટ વાંચન

Nashik News : आंदोलनस्थळी घेतली विद्यार्थ्यांची भेट
Nashik News नाशिक : आदिवासींच्या न्याय्य हक्कांचे आणि विविध प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. सरकारचे हे अपयश लपविण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर विनाकारण खापर फोडले जात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.https://maharashtramirror.com/ Nashik News
नाशिक येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी वडेट्टीवार यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेत सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.https://maharashtramirror.com/ Nashik News
नाशिकमध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना पाठिंबा देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकारही हिरावून घेतला जात आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना तडीपार करण्याचा कट सरकारकडून रचला जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. https://maharashtramirror.com/ Nashik News
आदिवासी विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी एकही मंत्री किंवा मुख्यमंत्री आंदोलनस्थळी आलेला नाही. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून घेण्याऐवजी तो दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. “सरकारला केवळ राहुल गांधीच दिसतात का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. https://maharashtramirror.com/ Nashik News
कुंभमेळ्यासाठी सरकारकडे हजारो कोटी रुपये खर्च करण्याची तयारी आहे; मग आदिवासी तरुणांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी निधीची कमतरता का भासते, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी केला. “कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. एवढा मोठा निधी खर्च करण्याऐवजी त्यातील काही हिस्सा आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला असता, तर या समाजाचा सरकारवरील विश्वास अधिक दृढ झाला असता,” असे ते म्हणाले. https://maharashtramirror.com/ Nashik News
काँग्रेसच्या काळातही कुंभमेळा तसेच चारधाम यात्रा नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या होत्या, असे सांगत वडेट्टीवार यांनी सध्याच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कुंभमेळा ५ ते १० हजार कोटी रुपयांतही व्यवस्थित पार पडू शकतो. मात्र, सध्या ३५ हजार कोटी रुपयांचा चुराडा केला जात आहे,” अशी टीका त्यांनी केली.
शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा विडा : वडेट्टीवार
शिक्षणावरील सातत्याने घटत असलेल्या खर्चाबाबत चिंता व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राजीव गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात शिक्षणावर देशाच्या उत्पन्नाच्या सुमारे ३.७ टक्के खर्च केला जात होता. मात्र, सध्या हा खर्च १.७ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.https://maharashtramirror.com/ Nashik News
“शिक्षणावरील खर्च कमी करणे म्हणजे देशाच्या भविष्यातील गुंतवणूक कमी करणे होय. सरकारने शिक्षणव्यवस्था बळकट करण्याऐवजी तिची अवस्था उद्ध्वस्त करण्याचा विडाच उचलला आहे,” अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.
