Pune News : बापटांविरोधात गणेश मंडळेही तक्रार करणार
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: गणेशोत्सवातील डीजे आणि मोठ्या आवाजाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यामुळे निर्माण झालेला वाद शांत होत नसतानाच आता विविध गणेश मंडळांकडून बापट यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारी देण्याची तयारी सुरू झाली आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune News : ‘भावना दुखावल्या, सामाजिक तेढ निर्माण केली’ असा आरोप; डीजे-ध्वनिप्रदूषणाच्या वादाला नवे वळण
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: गणेशोत्सवातील डीजे आणि मोठ्या आवाजाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यामुळे निर्माण झालेला वाद शांत होत नसतानाच आता विविध गणेश मंडळांकडून बापट यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारी देण्याची तयारी सुरू झाली आहे. बापट यांच्या वक्तव्यांमुळे भावना दुखावल्या, दोन समाजांत तेढ निर्माण झाली आणि सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचल्याचा आरोप संबंधित मंडळांकडून करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे, मोठ्या क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांचा वापर आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात बापट यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे. सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण होता कामा नये, असे त्यांचे म्हणणे आहे. याच भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गणेश मंडळे आणि बापट यांच्यातील वाद चर्चेत आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
या पार्श्वभूमीवर विविध गणेश मंडळांकडून बापट यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. बापट यांनी भावना दुखावल्या, दोन समाजांत तेढ निर्माण केली आणि सार्वजनिक शांततेला बाधा आणली, असे आरोप तक्रारींमध्ये करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
यापूर्वी हिंदू सेवा संघानेही बापट यांच्याविरोधात कोथरूड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. संघाचे अध्यक्ष रोहित रमेश मारणे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे तक्रार देऊन बापट यांच्या कथित वक्तव्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
दरम्यान, आपल्याविरोधात तक्रारी देण्याच्या तयारीवर बापट यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. तार्किक प्रतिवाद करता येत नसल्याने भावना दुखावल्याचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ध्वनिप्रदूषणाविरोधातील आपला लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बापट यांच्यावर गुरुवारी टिळक रस्त्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना हल्ला झाला होता. या प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी संतोष चव्हाण याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे.
एकीकडे बापट यांच्यावरील हल्ल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत असताना, दुसरीकडे त्यांच्याविरोधात गणेश मंडळांकडून तक्रारींची तयारी सुरू झाल्याने पुण्यातील गणेशोत्सव आणि डीजेच्या आवाजावरून सुरू झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे.
