મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : हल्ल्यानंतरही बापटांचा डीजेविरोधातील लढा कायम रविवारी मोर्चात सहभागी होणार

Pune News : पुणे महाराष्ट्र मिरर : टिळक रस्त्यावर झालेल्या मारहाणीनंतर सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी पत्रकार परिषद घेत डीजे आणि ध्वनिप्रदूषणाविरोधातील आपली भूमिका ठामपणे मांडली.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

2 મિનિટ વાંચન

हल्ल्यानंतरही बापटांचा डीजेविरोधातील लढा कायम रविवारी मोर्चात सहभागी होणार
हल्ल्यानंतरही बापटांचा डीजेविरोधातील लढा कायम रविवारी मोर्चात सहभागी होणार

Pune News : पुणे महाराष्ट्र मिरर : टिळक रस्त्यावर झालेल्या मारहाणीनंतर सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी पत्रकार परिषद घेत डीजे आणि ध्वनिप्रदूषणाविरोधातील आपली भूमिका ठामपणे मांडली. “माझ्यावर झालेला हल्ला ही वैचारिक दिवाळखोरी आहे. मी जिवंत आणि चालण्याच्या स्थितीत असेन तर रविवारी पुण्यातील मोर्चात नक्की सहभागी होईन,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.https://maharashtramirror.com/ Pune News
बापट म्हणाले, “मी कोण आहे किंवा कुठला आहे, हा मुद्दा नाही. मूळ विषयाला तार्किक उत्तर देता येत नसल्याने वैयक्तिक टीका केली जाते. सार्वजनिक ठिकाणी होणारे ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक कोंडी हा नागरिकांना होणारा थेट त्रास आहे. त्याविरोधात बोलण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे.”https://maharashtramirror.com/ Pune News
डीजे व्यवसायावर रोजगार अवलंबून असल्याच्या दाव्यावरही त्यांनी टीका केली. नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास देणारा व्यवसाय केवळ रोजगाराच्या नावाखाली सुरू ठेवता येणार नाही, असे सांगत त्यांनी डीजेच्या गोंगाटाला ‘सॉफ्ट व्हायलन्स’ची उपमा दिली.https://maharashtramirror.com/ Pune News
ध्वनिप्रदूषणाविरोधातील लढा यापुढे संघटनात्मक पातळीवर नेण्याचे संकेत देत बापट यांनी रविवारी डेक्कन येथील गुडलक चौकातून महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पोलीस संरक्षणाबद्दल बापट यांनी समाधान व्यक्त केले. हल्ल्यानंतरही आपली भूमिका बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, बापट यांच्यावरील हल्ल्याचा विविध राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे.

‘डीजेचा गोंगाट म्हणजे सॉफ्ट व्हायलन्स’; बापटांचा सवाल


विद्यानंद बापट यांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला ‘सॉफ्ट व्हायलन्स’ची उपमा देत सार्वजनिक रस्त्यांवर नागरिकांना गोंगाट सहन करण्यास भाग पाडणे चुकीचे असल्याचे म्हटले. उत्सवाच्या नावाखाली निर्माण होणारी ही दहशत आता सहन करण्यापलीकडे गेल्याचे ते म्हणाले.
‘डीजेचा गोंगाट म्हणजे सॉफ्ट व्हायलन्स’; बापटांचा सवालhttps://maharashtramirror.com/ Pune News
हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या आरोपावर बापट यांनी, “मुद्द्याला तार्किक उत्तर देता येत नसल्याने भावना दुखावल्याचा कांगावा केला जातो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कायद्याचे संरक्षण आहे,” असे स्पष्ट केले. सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावून नागरिकांना ‘सक्तीचे श्रोते’ बनवण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हल्ल्याच्या निषेधार्थ बापट काळ्या कपड्यात


टिळक रस्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यानंद बापट यांनी आज काळे कपडे परिधान केले. हल्ल्यानंतरही डीजेविरोधातील आपली भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ध्वनिप्रदूषण, वाहतूक कोंडी, पर्यावरण आणि नागरिकांच्या शांततेच्या अधिकाराचा हा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.https://maharashtramirror.com/ Pune News
दरम्यान, बापट यांच्यावरील हल्ल्याचा विविध राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असून, त्यासाठी हल्ला करणे चुकीचे असल्याचे म्हटले. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. हल्ल्यानंतरही बापट यांनी रविवारी होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

શેર કરો