Vasai Crime News : नायगाव पोलिसांची मोठी 'ड्रग' कारवाई! सोलापूर बाबा दर्गाजवळ पती-पत्नीसह 36 हजारांचा गांजा जप्त
•1.668 किलो अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक; पालघर जिल्ह्यात खळबळ
1 મિનિટ વાંચન

•1.668 किलो अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक; पालघर जिल्ह्यात खळबळ
वसई :- अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने एक मोठी आणि लक्षणीय कारवाई केली आहे. गुप्त बातमीच्या आधारावर पोलिसांनी 1 किलो 668 ग्रॅम वजनाचा, सुमारे 36 हजार 600 रुपये किंमतीचा गांजा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका पती-पत्नीला जेरबंद केले आहे.
कारवाईचा तपशील
नायगाव पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर बाबा दर्गाजवळ, रामवाडी, गोरातपाडा, चिंचोटी (ता. वसई) येथे 6 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. सपोनि गणेश केकान यांना गांजाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक अभिजीत मडके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये सुषमा पप्पू विश्वकर्मा (वय 30) आणि पप्पू राजनाथ विश्वकर्मा (वय 35, मूळ रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) या दोघांचा समावेश आहे. त्यांच्या कब्जात बेकायदेशीररित्या गांजा आणि मोबाईल असा एकूण 51 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दोघांविरुद्ध नायगाव पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (सी), 20 (ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उप आयुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाण्याचे पथकानी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे.
हेही वाचा: Pune News : 'महार वतन' जमिनीचा व्यवहार अखेर रद्द; पार्थ पवार प्रकरणातून अजित पवारांची माघार
