મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Vasai Crime News : वसईतील 'सम्राट ज्वेलर्स'मध्ये डल्ला मारणाऱ्या सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या!

• आचोले पोलिसांची पुण्यापर्यंत धडक; 1.50 लाखांचे मंगळसूत्र जप्त, महिला साथीदारासह जोडपे अटकेत

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Vasai Crime News

•आचोले पोलिसांची पुण्यापर्यंत धडक; 1.50 लाखांचे मंगळसूत्र जप्त, महिला साथीदारासह जोडपे अटकेत

वसई :- वसई पश्चिमेकडील डिमार्टजवळ असलेल्या 'सम्राट ज्वेलर्स' या दुकानात 12 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास एक खळबळजनक चोरीची घटना घडली होती. दुकानात ग्राहक बनून आलेल्या 30 ते 35 वयोगटातील एका संशयित स्त्री-पुरुषाने सोन्याचे दागिने पाहण्याचा बहाणा केला. दागिने पाहत असतानाच त्यांनी अत्यंत चलाखीने 1.50 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवून तिथून काढता पाय घेतला. याप्रकरणी दुकानमालक आकाश सुरेन्द्र जैन यांच्या तक्रारीवरून आचोले पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आचोले पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मुख्य आरोपी शेखर हेमराज वाणी हा पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून सतत आपले वास्तव्य बदलत होता. परंतु, पोलिसांच्या खबऱ्यांमार्फत मिळालेल्या पक्की माहितीनुसार, मुख्य आरोपी पुणे परिसरातील मांजरी बुद्रुक येथे राहत असल्याचे उघडकीस आले.

पुण्यातून आवळल्या मुसक्या; सराईत गुन्हेगारांचा पर्दाफाश

माहिती मिळताच आचोले पोलीस पथकाने पुण्यात सापळा रचून मुख्य आरोपी शेखर हेमराज वाणी (वय 34, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपली मैत्रीण शिवानी दिलीप साळुंखे (वय 27 , रा. अकलूज, जि. सोलापूर) हिच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून 10 ग्रॅम वजनाचे 1.50 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र पूर्णपणे हस्तगत केले आहे.

पोलिसांच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली असून, मुख्य आरोपी शेखर वाणी याच्यावर यापूर्वी तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत, तर त्याची साथीदार शिवानी साळुंखे हिच्यावरही ७ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आचोले पोलिसांच्या या धडक आणि यशस्वी कारवाईमुळे एका सराईत गुन्हेगार जोडप्याचा छडा लागला आहे.

हेही वाचा: Aaditya Thackeray: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी ठाण्यात वातावरण तापले; आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

શેર કરો