Pune News : उंड्रीतील ३५० मीटर रस्त्यावर एकेरी वाहतूक; पुणे वाहतूक पोलिसांची घोषणा
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : उंड्री परिसरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि वाहनधारकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune News : वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : उंड्री परिसरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि वाहनधारकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उंड्री येथील होलेवस्ती ते आर्यन वर्ल्ड स्कूल दरम्यानच्या सुमारे ३५० मीटरच्या रस्त्यावर आता 'एकेरी वाहतूक' (वन वे ) व्यवस्था लागू करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
कोंडीतून सुटकेसाठी उपाययोजना
उंड्री लिंक रोड आणि शाळा परिसरामध्ये गेल्या काही काळापासून वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळत होती. विशेषतः शाळेच्या सुटण्याच्या वेळी आणि ऑफिसच्या वेळेत या ३५० मीटरच्या पट्ट्यात मोठी वाहतूक कोंडी होत होती.https://maharashtramirror.com/ Pune News
पुणे शहर वाहतूक शाखेने ९ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मोटर वाहन कायदा, १९८८ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांन्वये हे आदेश जारी करण्यात आले आहेत. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी या अरुंद रस्त्यावर होणारी कोंडी टाळणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
वाहतुकीतील महत्त्वाचे बदल
नवीन अधिसूचनेनुसार, होलेवस्तीकडून आर्यन वर्ल्ड स्कूलकडे जाणाऱ्या ३५० मीटरच्या रस्त्यावरून वाहनांना एकाच दिशेने जाता येईल. तर आर्यन वर्ल्ड स्कूलकडून होलेवस्तीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना या रस्त्यावर प्रवेश दिला जाणार नाही.
आर्यन वर्ल्ड स्कूलकडून होलेवस्तीकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार वाहनधारकांनी कड नगर येथील एनआयबीएम बी.टी. कवडे रोड जंक्शनचा (कड नगर चौक) वापर करून पुढे आपल्या गंतव्यस्थानी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने व पोलीस वाहनांसारख्या अत्यावश्यक सेवांना या नियमातून सूट असेल.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
उंड्री परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता, लिंक रोडवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी आणि वाहनधारकांनी या बदललेल्या मार्गाचा वापर करावा, वाहतूक चिन्हांचे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक शाखेने केले आहे.
