Mumbai News : उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते; झिशान सिद्दीकींकडे मुंबईची जबाबदारी
Mumbai News :मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
1 મિનિટ વાંચન

Mumbai News :मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी, तर आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. खासदार पार्थ पवार यांच्या हस्ते दोघांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Mumbai News
मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Mumbai news
संघटना बळकट करण्याचे आवाहन
दिवंगत नेते अजित पवार यांचे विचार आणि जनसेवेचा वारसा पुढे नेत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांनी निष्ठेने व समर्पणाने काम करावे, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. या नियुक्त्यांमुळे पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या फेरबदलाला महायुतीतील दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची सहमती मिळाल्याचे सांगितले जात आहे. पक्षातील पाच मंत्री पार्थ पवार यांच्या रडारवर असल्याची आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
मंत्रिमंडळातील जातीय समीकरणांचा विचार करून मराठा समाजाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संभाव्य फेरबदलात काही ज्येष्ठ मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या फेरबदलाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
