Uddhav Thackeray News : ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनाला उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल; ‘गणेशगल्ली’च्या बाप्पाचेही घेतले दर्शन
Uddhav Thackeray At Lalbhaug Raja 2025 : रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोबत; ठाकरे कुटुंबीयांचे बाप्पाच्या चरणी नमन
1 મિનિટ વાંચન

Uddhav Thackeray At Lalbhaug Raja 2025 : रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोबत; ठाकरे कुटुंबीयांचे बाप्पाच्या चरणी नमन
मुंबई :- गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ आणि ‘गणेश गल्ली’तील ‘मुंबईचा राजा’ या दोन्ही बाप्पांच्या दर्शनासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray सहकुटुंब दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत सौ. रश्मी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. ठाकरे कुटुंबीयांनी दोन्ही ठिकाणी मनोभावे पूजा करून गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
તસવીરો · 1/6
Arrow Keys ⟵ ⟶
लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी शिवसेना सचिव सुधीर साळवी आणि मंडळाचे अध्यक्ष तसेच स्थानिक लोकाधिकार समितीचे बाळा कांबळे उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील सर्वात लोकप्रिय असलेल्या या दोन्ही मंडळांमध्ये बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांनीही बाप्पाच्या चरणी नमन केले. या भेटीमुळे गणेशोत्सवाच्या उत्साहाला आणखी भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबीयांनी विविध मंडळांना भेट देत गणेशोत्सव साजरा करत आहेत.
यावेळी ठाकरे यांनी दोन्ही बाप्पांकडे महाराष्ट्राच्या समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना केली. त्यांच्या भेटीमुळे लालबाग परिसरातील कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता.
