મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय 'चिमुरडीवर' लैंगिक अत्याचार

४७ वर्षीय नराधमाला केली पोलिसांनी अटक

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय 'चिमुरडीवर' लैंगिक अत्याचार

४७ वर्षीय नराधमाला केली पोलिसांनी अटक

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी एकतानगर भागातील एका सोसायटीतील चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी पीडितेच्या आईने काळेवाडी पोलिस ठाण्यात मंगळवारी (१४ एप्रिल) फिर्याद दिली असून, सोमवारी (१३ एप्रिल) दुपारी एक वाजता आरोपीच्या घरात हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुरडीला नराधमाने त्याच्या खोलीत बोलावून घेत आंबा खायला देण्याच्या आमिषाने लैंगिक अत्याचार केले. पीडितेला सकाळी सहा वाजता त्रास होऊ लागल्याने तिला महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तपासणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीला तिच्या आईने काय झाले विचारल्यावर तिने आरोपीने आंबा देण्यासाठी घरात बोलावल्यावर हा प्रकार केल्याचे सांगितले. त्यानंतर हॉस्पिटलने पोलिसांना पाचारण करीत घटनेची माहिती दिली. काळेवाडी पोलिसांचे एक पथक हॉस्पिटलमध्ये तर दुसरे पथक आरोपीच्या घरी दाखल होत त्याला अटक करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रीना कुराडे या तपास करीत आहेत.

Two and a half year old girl sexually assaulted by luring her with mango

શેર કરો