મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai crime : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: गोळी झाडणारा मुख्य संशयित निघाला मुंबईतील रॅपिडो चालक! कोटा पोलिसांच्या कारवाईत मोठा खुलासा

Mumbai crime : मुंबई :- बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर जुहू परिसरात झालेल्या सनसनाटी गोळीबार प्रकरणातील तपासात मुंबई पोलिसांच्या हाती अत्यंत मोठी आणि धक्कादायक माहिती लागली आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: गोळी झाडणारा मुख्य संशयित निघाला मुंबईतील रॅपिडो चालक! कोटा पोलिसांच्या कारवाईत मोठा खुलासा
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: गोळी झाडणारा मुख्य संशयित निघाला मुंबईतील रॅपिडो चालक! कोटा पोलिसांच्या कारवाईत मोठा खुलासा

Mumbai crime : राजस्थानमधून पकडलेल्या आरोपींच्या चौकशीत खळबळजनक माहिती उघड; सुपारी किलिंगच्या अँगलने तपास सुरू

Mumbai crime : मुंबई :- बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर जुहू परिसरात झालेल्या सनसनाटी गोळीबार प्रकरणातील तपासात मुंबई पोलिसांच्या हाती अत्यंत मोठी आणि धक्कादायक माहिती लागली आहे. राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानक परिसरातून जेरबंद करण्यात आलेल्या संशयितांपैकी मुख्य आरोपी हा मुंबईत रॅपिडो चालक (Rapido Driver) म्हणून काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या शातिर हल्लेखोरानेच अभिनेत्याच्या गाडीवर गोळी झाडल्याचा संशय असून, या खुलाशाने खळबळ उडाली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai crime

रॅपिडो चालकाचा थेट सहभाग; तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आवळल्या मुसक्या

ऋतिक कुमार असे नाव असलेला हा मुख्य संशयित मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात राहत असून उदरनिर्वाहासाठी तो रॅपिडो चालवण्याचे काम करत होता. जुहू येथील 'पुष्पा पार्क'जवळ रविवारी संध्याकाळी झालेल्या गोळीबारानंतर तो इतर दोन साथीदारांसह पसार झाला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा माग काढून कोटा पोलिसांच्या मदतीने त्यांना रेल्वे स्थानक परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले.

सुपारी किलिंगचा संशय दाट; कसून चौकशीसाठी आरोपींना मुंबईत आणले

सामान्य रॅपिडो चालक असलेला हा तरुण थेट बॉलिवूड अभिनेत्यावर गोळीबार करण्यापर्यंत कसा पोहोचला, यामागे लॉरेन्स बिश्नोई गँग किंवा अन्य कोणाची सुपारी होती का, याबाबत आता कसून चौकशी केली जात आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले जात असून, या रॅकेटमधील इतर सुगावे लवकरच बाहेर येतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો