મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

तीन वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून; एक अल्पवयीन संशयित ताब्यात

दक्षिण महाळुंगे येथे लेबर कॅम्पमध्ये घडला प्रकार

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

तीन वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून; एक अल्पवयीन संशयित ताब्यात

दक्षिण महाळुंगे येथे लेबर कॅम्पमध्ये घडला प्रकार

पुणे: घराजवळ खेळणाऱ्या तीन वर्षांच्या मुलावर अज्ञाताने बंद खोलीत नेत अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर त्याचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना दक्षिण महाळुंगे (चाकण) येथे उघडकीस आली आहे.

परराज्यातून कामासाठी आलेल्या आई आणि काका बरोबर हा मुलगा लेबर कॅम्प मध्ये राहत होता. तेथीलच एका खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणातील पोलिसांनी संशयितांचा माग काढून एका १६ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ तपास करीत आहेत.

શેર કરો