મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

उल्हासनगर मध्ये चोरी ; सोने-चांदी, प्लॅटेनियम धातूचे दागिने, डीव्हीआर,घड्याळे आणि रोख रक्कम चोरीला

Theft in Ulhasnagar : घरफोडी मध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज केला लंपास, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

उल्हासनगर मध्ये चोरी ; सोने-चांदी, प्लॅटेनियम धातूचे दागिने, डीव्हीआर,घड्याळे आणि रोख रक्कम चोरीला

Theft in Ulhasnagar : घरफोडी मध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज केला लंपास, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध

उल्हासनगर :- जगदीश शिवकुमार भावनानी (55 वर्ष) राहणारे शिवनगर उल्हासनगर-4 हे कामानिमित्त शनिवार-रविवार बाहेर गेले असता चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत भावनानी यांच्या घरावर डल्ला मारला आहे. सोन्या-चांदीचे, प्लॅटेनियम धातूचे दागिने, डीव्हीआर मशीन, घड्याळे असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनेनंतर जगदीश यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात Vitthalwadi Police Station घरफोडी झाल्याच्या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. Ulhasnagar Crime News

Theft in Ulhasnagar; Gold and silver, platinum jewellery, DVR, watches and cash were stolen

उल्हासनगर-4 मध्ये शिवनगर येथे असलेल्या जगदीश भावनानी यांच्या घरात कोण नसल्याच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मागील दरवाज्याच्या कोयंडा उचकटून त्यावाटे घरात प्रवेश केला आणि घरातील सोन्या चांदीचे, प्लॅटेनियम धातूचे दागिने, घड्याळे, डीव्हीआर असा एकूण 7 लाख 85 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी घरफोडीमध्ये लंपास केलाय. जगदीश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ),331(3),331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सपकाळ हे करत आहे. Ulhasnagar Crime News

हेही वाचा: Thane Crime News : अकस्मित मृत्यूचा वडिलांना संशय, पोलिसांकडून फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी घातपात झाल्याचा पोलिसांना ही संशय

શેર કરો