Pune News : द ट्रॅप ची गोव्यात बाजी
Pune News :पुणे : थरार, रस्य आणि आधुनिक शहरी जीवनातील वास्तव यांची सांगड घालणाऱ्या ‘द ट्रॅप’ या वेब सिरीजसाठी लेखक-दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांना ‘उत्कृष्ट दिग्दर्शक (एक्सपेरिमेंटल)’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1 મિનિટ વાંચન

Pune News : रामकुमार शेडगे यांना ‘उत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार
Pune News :पुणे : थरार, रस्य आणि आधुनिक शहरी जीवनातील वास्तव यांची सांगड घालणाऱ्या ‘द ट्रॅप’ या वेब सिरीजसाठी लेखक-दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांना ‘उत्कृष्ट दिग्दर्शक (एक्सपेरिमेंटल)’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १३ व्या गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे मराठी मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीला आणखी एक महत्त्वपूर्ण सन्मान मिळाला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
‘द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स’ या निर्मिती संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेली ‘द ट्रॅप’ ही वेब सिरीज थरारक आणि रहस्यमय कथानकावर आधारित आहे. सध्या तरुणाईला आकर्षित करणारी नाइट लाइफ, पबिंग, पार्ट्या आणि मौजमस्तीच्या जगात एक तरुणी कशी अडकते, या वातावरणातून तिच्यासमोर कोणती आव्हाने उभी राहतात आणि ती या चक्रव्यूहात कशी फसते, याचे चित्रण या सिरीजमध्ये करण्यात आले आहे. आधुनिक जीवनशैलीच्या आकर्षक दिसणाऱ्या बाजूमागील धोक्यांवरही ही कथा प्रकाश टाकते.
या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री जानकी आर, रामकुमार शेडगे, केतन पेंडसे, अमोल भगत यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी आकाश भापकर यांनी सांभाळली असून, लेखन आणि दिग्दर्शन रामकुमार शेडगे यांचे आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला ज्येष्ठ संगीत समीक्षक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ लेखक मनोहर सप्रे, विनायक कुलकर्णी आणि ज्येष्ठ छायाचित्रकार आनंद चैनी उपस्थित होते. महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना रामकुमार शेडगे म्हणाले, “ ‘द ट्रॅप’सारख्या वेगळ्या विषयावरील वेब सिरीजला १३ व्या गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळणे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या कलाकृतीसाठी मेहनत घेतलेल्या सर्व कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे हे यश आहे. वेगळे विषय, आशयपूर्ण कथा आणि प्रयोगशील मांडणीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर नवनवीन कलाकृती आणण्याचा माझा प्रयत्न यापुढेही सुरू राहील.”
