મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

झाडण कामाच्या ठेकेदारांच्या मक्तेदारीला लागणार लगाम

एका ठेकेदाराला शहरात मिळणार केवळ दोन ठिकाणचीच कामे !

PG
Prashik Ghaste

1 મિનિટ વાંચન

झाडण कामाच्या ठेकेदारांच्या मक्तेदारीला लागणार लगाम

एका ठेकेदाराला शहरात मिळणार केवळ दोन ठिकाणचीच कामे !

निलेश राऊत
पुणे
: शहराच्या स्वच्छतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या झाडण कामाच्या निविदांमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी आणि ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी तोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एका ठेकेदाराला आता जास्तीत जास्त दोनच ठिकाणची कामे घेता येणार आहेत.

महापालिकेच्या हद्दीमध्ये झाडणकाम करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर मनुष्यबळ पुरवण्यासाठी निविदा काढल्या जातात. या कामासाठी फार मोठ्या यंत्रसामुग्रीची आवश्यकता नसल्याने सर्वच ठेकेदारांचे समान येतात. त्यावर दर महापालिकेकडून चिठ्ठया काढून ठेकेदाराची नियुक्ती केली जाते. मात्र, ठरावीक ठेकेदारांनाच हे काम मिळावे, यासाठी नियम व अटी बदलण्यात आल्याच्या तक्रारी केल्या जातात.

गेल्यावर्षी निविदा प्रक्रिया रद्द
गेल्यावर्षी यामुळेच निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. झाडणकामामध्ये ठेकेदाराची जबाबदारी ही मनुष्यबळ पुरवण्याइतकी असते. परंतु, त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे, उपस्थिती व कामाचा दर्जा यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडेच असते. काही वेळा दुर्लक्षामुळे तर काही वेळा अर्थपूर्ण संबंधामुळे मनुष्यबळ कामावर नसतानाही बिले निघतात. तसेच कामाची गुणवत्ताही राखली जात नाही.

झाडणकामासाठी ठेकेदाराला दोनपेक्षा अधिक कामे दिली जाणार नाहीत. कामात पारदर्शकता राहून कामाचा दर्जा सुधारेल-आपापल्या हद्दीतील कामकाजाची जबाबदारीही संबंधित ठेकेदारावरच असल्याने अन्य तक्रारीही कमी होतील असे अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी सांगितले.

શેર કરો